नगरपरिषदेच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता रॅली


कराडः कराड नगरपरिषदेच्यावतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या स्वच्छता रॅलीचा समारोप झाला.

या स्वच्छता रॅलीमध्ये नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह नगरसेवक, शहरातील नागरिक, विविध शाळांचे हजारे विद्यार्थी व नगरपरिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते. 'होय मी तयार आहे' अशा आशयाचे फलक घेऊन अनेकजण या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.हाजी कासम दानेकरी शाळेच्या विद्यार्थी नी व्यसन मुक्तीवर पथनाट्य सादर केले.

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती प्रियांका यादव यांनी उपस्थित सर्वांना आरोग्याची शपथ दिली. या स्वच्छता रॅलीमध्ये महात्मा गांधी यांच्या वेशात सहभागी झालेल्या चार वर्षांच्या मुलासह संत गाडगेबाबा यांची वेशभूषा परिधान केलेल्या व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

No comments

Powered by Blogger.