Your Own Digital Platform

कन्हेरीत सामूहिक श्रमदान व स्वच्छता मोहीम


कन्हेरी ता.बारामती :
शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय सौ.शर्मिला वहिणीसाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत स्व तात्यासाहेब यांचे प्रेम असलेल्या श्री क्षेत्र कन्हेरी गावात आज सामूहिक महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील शालेय विद्यार्थी ग्रामस्थ फौंडेशनच्या सर्व सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला यावेळी विविध वेशभूषा केलेल्या विध्यार्थ्यांनी गावात प्रभातफेरी काढून स्वच्छते विषयी जनजागृती केली यावेळी फौंडेशन तर्फे श्री मारुती मंदीरात राबविण्यात येत असलेल्या विकास कामांची पहाणी करून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास डॉ राजेश कोकरे डॉ परेश वाघमोडे बाळासो बेलदार ह भ प लक्ष्मण महाराज कोकाटे बाळासो शिंदे आत्माराम देवकाते मान्यवर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका पूनम गायकवाड साधना शेलार आदी मान्यवरांसह शरयु फौंडेशनचे सर्व जेष्ठ मान्यवर युवक मित्र शालेय विद्यार्थी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.