भविष्यातील राजकारणाचे महादेव जाणकर सुपर मॅग्नेट :- विष्णू चव्हाण


जावली : भविष्यातील राजकारणाचे सुपर मॅग्नेट महादेव जानकर असल्याचे रासप नेते विष्णू अप्पा चव्हाण यांनी फलटण तालुक्यातील सरडे येथे रासप शाखा उदघाटन प्रसंगी सांगितले, त्यांच्या प्रत्येक कृतीतुन साधेपणाची झलक दिसते.सामान्यांना व उपेक्षितांना, गोरगरिबांना स्वप्न दाखवणारा नव्हे तर त्यांची स्वप्ने सत्यात आणन्यासाठी उत्तेजन देणारा अवलिया ,गल्लीतच नव्हे तर दिल्लीतच प्रतिस्पर्ध्याना धडकी भरावणारा आणि मंत्री असूनही, आजही बॅनर, झेंडे , बांधणारा,सभेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखे सभेत बसणारा माझा नेता, प्रगतीचा आलेख सतत उंचावणारे नेते असल्यामुळे सर्व सामान्य लोकांना आपलेसे वाटतात, असे यावेळी विष्णू चव्हाण म्हणाले.

यावेळी राज्यकार्यकरिणी सदस्य,भाऊसाहेब वाघ,प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी कल्पना गिट्टे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष सविताताई पाटील, बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी बापूराव सोलनकर, सातारा जिल्हा अध्यक्ष,मामुशेठ वीरकर, जेष्ठ नेते खंडेराव सरक सातारा जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पूजाताई घाडगे,खटाव च्या अध्यक्षा शुभांगी फडतरे, फलटण तालुका अध्यक्षा सुवर्णाताई नाळे,माढा लोकसभा उपाध्यक्ष,संतोष ठोंबरे,फलटण तालुका अध्यक्ष प्रा संतोष सोनवलकर युवक अध्यक्ष निलेश लांडगे,डॉ. दादासो भिसे, काकासाहेब बुरुंगले, तुकाराम गावडे, प्रताप जाधव, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष प्रा.संतोष सोनवलकर, व आभार सरडेगांव चे सरपंच दत्ताजी भोसले यांनी मानले

No comments

Powered by Blogger.