Your Own Digital Platform

मलकापुरात चोरट्यांनी एटीएम फोडले


कराड : आगाशिवनगर, मलकापूर (ता. कराड) येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. मात्र, त्यातील रक्कम चोरट्यांना चोरता आली नाही. शुक्रवारी (दि. 12) ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आगाशिवनगर येथे रविचंद्र आर्केड बिल्डिंगमध्ये ढेबेवाडी रोडलगत एटीएम आहे. अज्ञात चोरट्याने शुक्रवारी रात्री 8 ते शनिवारी सकाळी दहा या कालावधीत गॅसकटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला; परंतु चोरट्यांना यामधील रक्कम काढता आली नाही. याबाबातची फिर्याद सागर सुरेश घाडगे यांनी शहर पोलिसात दिली आहे.