Your Own Digital Platform

पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.च्या फलटण दालनाचे उद्घाटनफलटण: तब्बल १७८६ वर्षांची परंपरा असलेल्या आणि सोने-चांदी व हिरे दागिन्यांच्या व्यवसायातील देशातील आघाडीचा व विश्वासार्ह ब्रँड पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडच्या फलटण दालनाचे उद्घाटन सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सोमवारी झाले.

यावेळी पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे अजित गाडगीळ, सतीश कुबेर, श्रीकांत कुबेर, जितेंद्र जोशी यांच्यासह फलटण दालनाचे व्यवस्थापक सचिन थोरात उपस्थित होते. तसेच, प्रतापसिंह निंबाळकर, अॅड. नेवसे उपस्थित होते.

फलटणमधील रिंगरोडवरील नामजोशी पंपासमोरील पुष्प कॉम्प्लेक्समध्ये हे दालन असून, फलटणसह आजूबाजूच्या गावांतील ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे हे २७ वे दालन आहे.

पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडचे श्री. अजित गाडगीळ म्हणाले, “फलटण ही दागिन्यांची पारंपरिक व महत्त्वाची बाजारपेठ असून, ती वाढत आहे. त्यामुळेच ग्राहकांच्या आग्रहानुसार आम्ही येथे दालन सुरू केले आहे. दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीसाठी पु. ना. गाडगीळ आणि सन्स ओळखले जातात. त्यामुळेच ग्राहकांना सोने-चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी येथे आहेत. डायमंड ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी, रोझ गोल्ड, बाजीराव मस्तानी, लँटर्न कलेक्शन, लाइटवेट ज्वेलरीबरोबर चांदीचे दागिने व भेटवस्तूंच्या असंख्य व्हरायटी येथे आहेत.”

“या दालनामुळे फलटणकरांना दागिने खरेदी करण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. पुणे-मुंबईबरोबर एकाचवेळी येथेही सोने-हीरे व चांदीच्या दागिन्यांची कलेक्शन्स उपलब्ध आहेत. सोने बचत योजनाही उपलब्ध होईल. तसेच, दसऱ्याला सोने वेढणी-नाणी, आपटा पान आदी विक्रीची विशेष व्यवस्था असेल. येणाऱ्या दसरा-दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा,” असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडचे विक्री प्रमुख सतीश कुबेर यांनी सांगितले.