शिवेंद्रराजेंवरीलही अन्याय खपणार नाही


सातारा : अन्याय झालेला मला आवडत नाही, मग हा अन्याय अगदी शिवेंद्रराजे यांच्यावर जरी झाला तरी मला ते खपणार नाही. मी तत्वाशी बांधील आहे. जे योग्य आहे त्याच्या पाठीशी राहीन, अशी रोखठोक भूमिका खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा क्‍लब हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना मांडली.गुरुवारी खा. उदयनराजे भोसले यांना जामीन झाला. यानंतर जुना मोटर स्टँडप्रकरणानंतर प्रथमच पत्रकारांशी ते बोलले. खा. उदयनराजे म्हणाले, जगात लोकशाही संगळ्यांना मान्य आहे. जे मला मान्य आहे ते मला लागू होतं. प्रत्येकवेळा सारखं कोर्टात जायचं हजर राहयचं, जामीन घ्यायचा, कधी विचार केला आहे का? मी जे करतो ते केलंच पाहिजे अशातला काहीच भाग नाही. पण माझं स्वत:चं कर्तव्य समजून मी ते करत असतो. मी तत्वाशी बांधील आहे. बोलतो तेच करतो. त्यामुळे मला इतरांशी काहीही देणंघेणं नाही. मला अन्याय सहन होत नाही कोणीही असुदेत मग अगदी आ.शिवेंद्रराजेंवरही अन्याय झालेला मी खपवून घेणार नाही.

मंडईमध्ये जागा त्या खुटाळ्यांची, त्या मंडईमध्ये महिला वर्ग जातो. ज्या ठिकाणी हे प्रकरण झाले त्या ठिकाणी ट्रकबेचे आरक्षण आहे. उर्वरित जागा नसताना त्या लोकांनी पैशाच्या जोरावर आरक्षण घेवून त्या ठिकाणी दारूचे दुकान चालू ठेवले. मी म्हणतो त्यावर विश्‍वास ठेवू नका, जावून प्रत्यक्षात बघा, काय अवस्था असते तेथे. थिएटर होते ते बंद पडले का बंद पाडले? तर हे सर्व ढोसलतात. या ठिकाणी जावून मग्रुरी करतात, एवढी काय मोगलाई लागून गेली आहे का? एखादे दारूचे दुकान बंद झाल्याने लोकांचे कल्याण होत असेल तर मी चुकीचे काय करतोय? किंबहूना मला अशी अपेक्षा होती आमदार या नात्याने माझे धाकटे बंधूराज शिवेंद्रराजेंनी त्यांच्या जवळच्या मित्रांना सांगायला हवे होते. मला या घटनेत दोषी मानत असाल तर मी दोष स्वीकारतो. हा अन्याय सहन होवू देणार नाही. मग तेथे पोलिस असो वा कोणीही असो. अनेक लोक इश्यूचा नॉन इश्यू करतात. काळजात रूततंय मग त्यात कोणीही असुद्या पक्ष कुठलाही असुद्या अन्याय झाला तर सहन करणार नाही, असेही खा. उदयनराजे म्हणाले.

खा. उदयनराजेंच्या भूमिकेला आ. शिवेंद्रराजे यांनी प्रत्युत्तर दिले असून लोकप्रतिनिधींनी खरे बोलावे, असे म्हटले जाते. खासदार साहेबांनी जे आहे ते खरे सांगावे. विषय दारूच्या दुकानाचा नव्हे तर खुटाळे यांची जागा मोकळी करून देण्याचा होता. दंडेलशाही करून जागा मोकळी करून देण्याचा नियोजित प्लॅन त्यांचा व समर्थकांचा होता. सर्व नियोजनबध्द त्या दिवशी कार्यवाही झाली. रवी ढोणे व पोलिसांमुळे खासदारांचा प्लॅन यशस्वी झाला नाही.जर तुम्हाला लोकांची एवढीच चिंता असेल तर मतदारसंघातील सर्व देशी दारूची दुकाने बंद करून दाखवावी. त्या दिवशीसुध्दा त्या जागेतील दुकान काढण्यासाठी खा. उदयनराजे भोसले हे सुपारी घेऊनच आले होते. फक्‍त त्यांच्याच दुकानापुरती तत्वे दाखवू नका. आरक्षण हे त्या दुकानापुरते नाही तर जुना मोटार स्टँडचे आहे. शासनाचे आदेश असल्यास कार्यवाही करावी त्याला कोणी अडवणूक करणार नाही. माझ्या बगलबच्च्यांसाठी असाव हे त्यांचे काम होते. खासदार बोलले ते वस्तुस्थिती आहे. खासदारांच काम जागा मोकळ्या करण्याच काम आहे का? न्यायालयाच्या पुढे जाऊन तुम्ही काम करणार का? असा सवालही आ. शिवेंद्रराजे यांनी केला.

No comments

Powered by Blogger.