महाबळेश्‍वरमध्ये युगुलाची आत्महत्या


महाबळेश्‍वर : हाताच्या नसा कापून महाबळेश्‍वर येथील प्रसिद्ध लिंगमळा धबधब्यावरून उडी मारून एका युगुलाने शुक्रवारी सायंकाळी आत्महत्या केली. या दोघांचे मृतदेह 400 ते 500 फूट खोल दरीत आढळून आले. तर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी रक्ताने माखलेला चाकू, व आधारकार्ड सापडले असून, दोघांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. 

महाबळेश्‍वर शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर प्र्रसिद्ध लिंगमळा धबधबा आहे. हे पर्यटकांचे मोठे आकर्षण असल्याने नेहमीच इथे गर्दी होते. शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमरास एका हॉटेलमधून एक युगुल टॅक्सीमधून लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी आले होते. अर्धा ते एक तासाच्या कालावधीत सर्व पर्यटक हा धबधबा पाहून येतात. मात्र, हे दोघे दुपारी 4 वाजेपर्यंत धबधब्यावरून परतलेच नाहीत. त्यामुळे टॅक्सी चालक निघून गेला. 

मात्र, याची खबर त्याने वन व्यास्थापन समितीच्या कर्मचार्‍यांना दिली. याची माहिती वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड यांना दिल्यानंतर त्यांनी सहकार्‍यांच्या साथीने दोघांचा शोध घेण्यासाठी धबधब्याचा परिसर व जंगल पिंजून काढले. परंतु, ते कोठेही आढळून आले नाही. त्यामुळे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यातील पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोना दत्तात्रय नाळे यांनी तातडीने महाबळेश्‍वर व सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांना घेऊन घटनास्थळी धाव घेऊन शोध कार्य सुरू केले. 

 जवानांनी धबधब्याच्या वरील परिसरात शोध घेतल्या नंतर धबधब्याच्या मुख्य भागात शोध सुरू केला.त्यावेळी मोठया प्रमाणावर रक्त सांडल्याचे दिसून आले. तेथेच रक्ताने माखलेला एक चाकू आढळुन आला. व अविनाश आशोक शिर्के (वय 26, रा. निंभवी ता. अहमदनगर) यांचे आधार कार्ड मिळाले.आधार कार्ड व चाकू मिळाल्यानंतर दोघांचा शोध घेण्यासाठी धबधब्याच्या दरीत 400 ते 500 फूट खोल दरीत सायंकाळी 7 वाजता दोघांचाही मृतदेह आढळून आला.यानंतर रात्री उशीरा ट्रेकर्सच्या जवानांनी भेकवली वनव्यास्थापन समितीच्या सहकार्याने दोघांचे मृतदेह बाहेर काढले.

महाबळेश्‍वर ट्रेकर्सचे अनिल केळगणे, सुनिल बाबा भाटीया संदीप जांभळे, अनिल लांगी, निलेश बावळेकर, ओंकार नाविलकर, दिनेश झाडे तर सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पार्टे आणि त्यांच्या जवानांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला.


No comments

Powered by Blogger.