आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

सातारा बसस्थानकात डिझेलचा तुटवडा; लाखोंचा फटका


सातारा : सोमवारी दुपारी सातारा आगारातील डिझेलचा साठा संपल्याने दुपारपासून सर्व बसेसची चाके थांबली होती. सातारा आगाराकडे डिझेल घेण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे आगारातील शेकडो बसफेऱ्या रद्द झाल्याने आगाराला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.सोमवारी दुपारपासून सातारा बसस्थानकामध्ये डिझेलचा तुटवडा जाणवू लागला. डिझेल नसल्याने बसेस अडकून पडल्या होत्या. एसटी महामंडळाकडे इंधन घेण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याचे एसटी बसेसची चाके थांबली होती. बुधवारी दुपारपर्यंत ही टंचाई राहणार असून आणखी काही फेऱ्या रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आईन सणासुदीच्या काळात डिझेल टंचाई जाणवत असल्याने आगाराला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

दरम्यान, सातारा आगरातून दुपारी सातारा कोल्हापूर ही बस रवाना झाली होती. चालकाला कराड आगारात डिझेल भरण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, कराड आगारात बस गेल्यानंतर डिझेल दिले नसल्याने पुन्हा बस साताऱ्याला माघारी आली. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. या प्रकारची माहिती घेण्यासाठी सातारा डेपोच्या आगरप्रमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आगार प्रमुख यांनी फोन उचलला नाही.