कर्मवीरांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरांत पोहोचविली नसती तर आज ग्रामीण भागात दारिद्रय पहावयास मिळाले असते : प्रभाकर देशमुख


मायणी : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात पुढाकार घेतला नसता तर आज बहुजन समाजातील मुले पुढे आली नसती व शिक्षण घेऊ शकली नसती .तर ती कुठे तरी मजुरी करताना दिसली असती .कर्मवीरांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरांत पोहोचवली नसती तर आज ग्रामीण भागात दारिद्र्य पाहावयास मिळाले असते असे प्रतिपादन कोकण विभागाचे माजी आयुक्त व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल कमिटीचे सदस्य प्रभाकर देशमुख यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या सिध्दनाथ विद्यालय ,निमसोड ता. खटाव येथे १३१वा कर्मवीर जयंती सोहळा व रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित समारंभात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते .सदर वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोल मॉडेल साप्ताहिकाचे चे संपादक अविनाश कदम होते .सदर वेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य नंदकुमार मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काकासाहेब मोरे, उपसरपंच संतोष देशमुख, प्रा. शिक्षक बॅँकेचे संचालक चंद्रकांत मोरे , रवींद्र भादुले ,सुनिल मोरे , डॉ. हरिश जगदाळे, माजी मुख्याध्यापक दगडे, अमोल मोरे, मोहन घाडगे ,युवराज घार्गे आदी मान्यवर उपस्थित होते .


प्रभाकर देशमुख मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण मिळणेसाठी या भागातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक आदर्श असा शैक्षणिक आराखडा राबविणे गरजेचे आहे.गुणवत्ता वाढीची शिक्षकांनी भूमिका घेतली व ग्रामस्थांनी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या तर विद्यार्थ्यांचे भवितव्य घडून चांगले संस्कार घडविण्यास मदत होईल .

शैक्षणिक संस्थांना शासनाकडून मदत मिळण्यात अनंत अडचणी येत आहे .त्यासाठी या पुढील काळात शैक्षणिक संस्थांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे .शाळेच्या विकासात ग्रामस्थांनी व माजी विदयार्थी योग्य प्रकारचे योगदान देणे गरजेचे आहे .सर्वसमावेश असा माजी विद्यार्थाचा मेळावा घेऊन त्यांची कमिटी स्थापन करावी व त्यांच्या माध्यमातून शाळा अद्ययावत करण्याचा संकल्प करावा.बौद्धिक विकासाबरोबरच मुले कर्तृत्ववान होऊन आकाशाला गवसणी घालतील मात्र त्यानंतर मुलांच्या मनात या शाळेत यावे असे वाटेल असे संस्कार करणे गरजेचे आहे.मागच्या पिढीने दिलेली शिदोरी बदलत्या काळानुसार त्यामध्ये बदल करून पुढील पिढीकडे देणे गरजेचे आहे. जगातील विविध ज्ञानाची दालने विद्यार्थ्यांसमोर खुली केली पाहिजेत. तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरून त्यांना अष्टपैलू बनविणे गरजेचे आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना रोल मॉडेल साप्ताहिकाचे संपादक अविनाश कदम म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मराठे दिसले नसते ,तसेच कर्मवीर नसते तर शिक्षण क्षेत्रातील क्रांती दिसली नसती .शिक्षण क्षेत्रातील रयतेचे राजे हे कर्मवीर होते .

जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य नंदकुमार मोरे म्हणाले, महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीत रयत शिक्षण संस्थेचा मोलाचा वाटा आहे .मंदिर उभारण्याऐवजी ज्ञान मंदिरांचा विकास होणे गरजेचे आहे .रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षात येथील सिध्दनाथ विद्यालयाचा विकास करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने आर्थिक मदत करू .

प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.जी. लंगडे,म्हणाले माजी विद्यार्थी हे शाळेची श्रीमंती असतात .माजी विद्यार्थ्यांनी एकत्र होऊन जुन्या आठवणींना उजाळा द्यावा व विद्यालयाचे आर्थिक मदतीतून ऋण फेडावे .

यावेळी कुमारी समीक्षा मोरे, सुनील मोरे ,संतोष देशमुख , सौ. कमल जगदाळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली .रामहरी निंबाळकर यांनी सुत्रसंचलन केले.गोरे यांनी आभार मानले .सदर वेळी रांगोळी प्रदर्शन विज्ञान, प्रयोगशाळेचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.


मुलींची स्वतंत्र पाणपोई व विद्यालयाच्या मैदानाचे सपाटीकरण करुन देण्याचे माजी विद्यार्थी मोहन घाडगे यांनी जाहीर केले. 

माजी विद्यार्थांचा मेळावा आयोजित करुन त्यातून विद्यालयाच्या विकासासाठी भरघोस आर्थिक मदत करण्याचे आश्वासन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य नंदकुमार मोरे यांनी यावेळी देऊन स्वतः५१हजार रुपयांचा धनादेश प्रभाकर देशमुख यांचे हस्ते मुख्याधापकांकडे सुपूर्त करुन देणगी संकलनाचा शुभारंभ केला.

No comments

Powered by Blogger.