जनावरांची वाहतूक करणारी तीन वाहने पोलिसांच्या ताब्यात


ढेबेवाडी : कोकणातून जनावरे भरून निघालेले तीन टेम्पो ढेबेवाडीजवळ दिवशी घाटात ढेबेवाडी (ता. पाटण, जि. सातारा) पोलिसांनी पकडले. टेम्पोत २९ बैल भरले होते. त्यापैकी एकाचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग  परिसरातून खरेदी केलेली ही जनावरे एम.एच.०८ एच ३३८८, एम.एच.०८ एच ३२७७, एम.एच.०८ डब्ल्यु ३९६७ या टेम्पोतून कोल्हापूर जिल्ह्यातील वडगांव येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे टेम्पो चालकांनी सांगितले आहे. दोन चालक खर्डी ता.चिपळूण व एक रामापूर (ता.पाटण) येथील आहे. पोलिसांनी तिन्ही टेम्पो चालकांना ताब्यात घेतले आहे. पुढील कार्यवाही फौजदार भजनावळे करीत आहेत.

दरम्यान सदरचे बैल परवानाधारक गो- शाळेत पाठवाणार आहोत असे सपोनि भजनावळे यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.