सायघर पठार रान फुलांनी बहरले


कुडाळ: जावळी तालुक्यातील सायघरचे पठार पिवळ्या रानफुलांनी बहरले असून जिकडे तिकडे चोहीकडे फुलेच फुले असे चित्र दिसत आहे. महाबळेश्वर पाठोपाठ जावली तालुक्यात दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. पाऊस संपताच निसर्गाची मुक्त उधळण जावळीच्या डोंगरदऱ्यातून दिसून येते. 

जावळी तालुक्याच्या सरहद्दीवरच कास पठार ही आहे. त्याच धर्तीवर जावळी तालुक्यातील बहुतांशी डोंगररांगांवर विविध रानफुलं उमलू लागली आहेत.केवळ कास पठारावर नव्हे तर जावळी तालुक्यातील सगळ्याच डोंगररांगांवर विविध रानफुलांचे उधळण दिसून येत आहे. विशेषतः कास पठारावर विविध रंगांची फुले दिसून येतात. मात्र, येथील विशिष्ट म्हणजे एक एक डोंगर एका एका रंगाच्या फुलांनी सजलेला दिसून येत आहे.

 या निसर्गाच्या मुक्त उजळणीला चुकून या रस्त्याला आलेल्या पर्यटक व येथील फुललेले निसर्ग आपल्या डोळ्यात सामावून घेत असतात. महाबळेश्वर पाचगणीवरून भिलार मार्गे मेढा कडे येणारा रस्ता चारी बाजूंनी फुलांनी बहरून गेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा पिवळ्या फुलांचा सडा पडला आहे. हिरव्यागार गवतावर पिवळी झार फुले वाहणाऱ्या थंडगार हवेत डौलाने डोलत आहेत. अशा निसर्गाच्या मुक्त उधळला पाहण्यासाठी कुडाळ मेढा रोड मार्गे मारली भिलार रस्त्यावर आल्यानंतर सायघर मारली हातगेघर मुरा या पठारावर हा निसर्ग पाहण्यासाठी मिळेल.

No comments

Powered by Blogger.