चंद्रकांत पाटील राज्यात कोठूनही निवडून येतील : डॉ. अतुल भोसले


कराड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासह राज्यातील प्रत्येक विभागाला कोट्यावधींचा निधी मिळाला आहे. त्यामुळे कराड दक्षिणच काय पण, राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्यास भाजपा कार्यकर्त्यांना त्याचा आनंदच होईल आणि आपण त्यांचे स्वागत करू, अशा शब्दात पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.कराडमधील शिवाजी स्टेडियमला दोन कोटींचा निधी मिळाला आहे. 

या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. कराड शहरासाठी ६५ कोटींचा प्रस्ताव यापूर्वीच आपण नगराध्यक्षा तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावातील स्टेडियमसाठीच्या दोन कोटींना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित कामांचा निधीही लवकरच मंजूर होईल अशी आशा व्यक्त करत ना. डॉ. भोसले यांनी ना. चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

No comments

Powered by Blogger.