मायभूमीत परतणार्‍या जवानांचे उंब्रजकरांनी केले जल्लोषात स्वागत


उंब्रज : देशाच्या रक्षणासाठी छातीचा कोट करुन रक्षण करणारा उंब्रज ता.कराड येथील जवान सुनिल महादेव जाधव हा 18 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मायभूमीत परतल्यानंतर त्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. देशाचे रक्षण करणार्‍या जवानांबद्दल देशवासियांमध्ये नेहमीच आदराची भावना असते. देशभरात सातारा जिल्हा हा लष्करी सेवेची परंपरा जपणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशसेवा बजावून मायभूमीत परतणार्‍या जवानाचा केलेला सत्कार म्हणजे अठरा वर्षे प्रामाणिकपणे केलेल्या देशसेवेची पोहोच पावती म्हणावी लागेल.

देशाच्या सेवेसाठी सातारा जिल्ह्यातील हजारो जवान सुरक्षा दलामध्ये कार्यरत आहेत प्रतिवर्षी शेकडोजण सैन्य दलात भरती होतात.देशात कोठेही, काहीही अनुचित घटना घडल्यास सातारचे सुपूत्र आपल्या कर्तृत्वाने सातारा जिल्ह्याचे नाव नेहमीच उंचावत असतात.यामध्ये पोलीस, सैनिक दल तसेच लष्करात सातारचे जवान नेहमीच अग्रेसर असतात. याच कारणामुळे लष्करी परंपरेचा जिल्हा म्हणून सातारची ओळख आहे.सुनील आणि त्यांचे मित्र अजय गोसावी (गडहिंग्लज) हे उंब्रज येथे आल्यानंतर उंब्रज येथील ग्रामस्थ आणि त्याचा मित्र समुदाय यांनी उंब्रज मधून त्याची ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढली. तसेच यावेळी मित्र परिवार व ग्रामस्थ यांच्या हस्ते जवानांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.

यावेळी जवानांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नंतर ग्रामदैवताचेे दर्शन घेतले. यावेळी मित्र परिवार व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.