आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

पुसेगावात फ्लेक्स लावण्यावरुन मारामारी


खटाव : पुसेगाव ( ता. खटाव ) येथे फ्लेक्स लावण्यावरुन दोन गटात मारामारी झाली. दोन्ही गटाकडून पुसेगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्यानंतर एकूण तेरा जणांना अटक करण्यात आली.पुसेगाव पोलिस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री साडेदहा वाजता फ्लेक्स लावण्यावरुन दोन गटात बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुंपातर हाणामारीत झाले.

घटनेनंतर रणधीर जाधव, धीरज जाधव, शंतनू वाघ, पृथ्वीराज जाधव, विनोद जाधव यांनी ओंकार जाधव, प्रविण जाधव, सुरेश जाधव, मोहन जाधव, सागर जाधव, रोहीत जाधव, अमित देशमुख, अक्षय जाधव, विशाल जाधव, सुशांत जाधव यांच्या विरोधात मारहाण आणि सोन्याची चैन हिसकावल्याची तक्रार दाखल केली. दुसऱ्या गटानेही पहिल्या गटाविरोधात शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली. दोन्ही गटातील तेरा जणांना पोलीसांनी अटक केली.

रणधीर जाधव, धीरज जाधव यांच्यासह पाच जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. मारामारीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुसेगावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.