डॉ. अनिल काकोडकर यांना डॉ. नरेंद्र दाभोळकर पुरस्कार जाहीर


सातारा : सातारा नगरपालिकेतर्फे देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्कार प्रसिध्द अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते आणि साविआचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत दि. 14 रोजी सायंकाळी 6 वाजता शाहूकला मंदिर येथे होणार आहे.

उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सातारी कंदी पेठे असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कार सोहळ्यास नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, सभागृह नेत्या स्मिता घोडके,  सर्व सभापती, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार वितरणासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकणी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. पुरस्कार वितरण सोहळ्यास सातारकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.