Your Own Digital Platform

मेरा 'सातारा'से विशेष नाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी


खटाव : मेरा सातारासे विशेष नाता हैं, मेरे प्रारंभी जीवनमें जिनसे मेरी शिक्षा, दिक्षा हुई वो लक्ष्मणराव इनामदार जिन्हें हम वकीलसाहब कहते हैं, वो साताराके थे. वकीलसहाबसे मुझे बहुत कुछ सिंखनेको मिला. साताराके लोगोंसे मिलनेके बाद मुझे उनकी बहुत याद आती हैं, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.शिर्डीतील कार्यक्रमात खटावच्या गुरु लक्ष्मणराव इनामदारांचे केले स्मरण

शिर्डी येथील कार्यक्रमादरम्यान मोदींनी राज्यातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. सातारा जिल्ह्यातील लाभार्थी महिलांशी संवाद साधताना त्यांनी सातारा जिल्ह्याशी विशेष नाते आहे असे सांगताना त्यांचे गुरु खटावच्या लक्ष्मणराव इनामदार यांचे स्मरण केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, नुकतेच देशात लक्ष्मणराव इनामदार यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात आले. जेव्हा मी साताऱ्याच्या लोकांना भेटतो तेव्हा मला वकीलसाहेबांची आठवण येते.

पंतप्रधान मोदींनी साताऱ्याचा विशेष उल्लेख करत जिल्ह्याशी खास नाते असल्याचे सांगितले. आता ते खटावला कधी भेट देतात याची उत्कंठा वाढली आहे. वकीलसाहेबांच्या जन्मभूमिला त्यांनी भेट द्यावी म्हणून खटावच्या लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट आणि लक्ष्मणराव इनामदार चॅरिटेबल ट्रस्टकडून प्रयत्न सुरु आहेत.