Your Own Digital Platform

स्वाभिमानी कडून सहकार मंत्री यांचा निषेध


फलटण : न्यू फलटण शुगर वर्क्स या कारखान्याने गत गाळप हंगामाचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिले नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठ ते दहा महिन्यात विविध बैठका, मोर्चे,आंदोलने केली. मात्र, सरकारने याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने रविवारी सहकार मंत्री ना.सुभाष देशमुख फलटण दौऱ्यावर आले असताना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात कट कारस्थान रचत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी केला.

फलटण येथील न्यू शूगर वर्क्स ने शेतकऱ्यांची सुमारे 51 कोटी रुपयांची देणी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फलटणमध्ये विविध आंदोलने केली. वायदा केलेल्या तारखेला बिल मिळाले नसल्याने स्वाभिमानीने फलटणमध्ये 27 दिवस ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर पालकमंत्री ना विजय शिवतारे यांनी मध्यस्थी करून हे आंदोलन स्थगित करण्यास सांगितले होते. त्यावेळी त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्याची बिले वेळेवर दिले जातील असे आश्वासन दिले होते.

 मात्र रविवारी सहकार मंत्री ना.सुभाष देशमुख यांनी दाखवलेला दुजाभाव पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध केला. या मुळे हे मंत्री व सरकार शेतकरी विरोधात असल्याचे निष्पन्न होत असल्याचा आरोप यावेळी केला