Your Own Digital Platform

दारूचे बॉक्स घेऊन जाणारी गाडी अडवली; दोघे पोलिसांच्या ताब्यात


लिंब : लिंब (ता.सातारा) येथे सकाळी दारू पार्सल करणारी स्कॉर्पिओ (MH-14-DA-1899)ही गाडी महिलांसह युवकांनी पकडली.या गाडीमध्ये 10 देशी दारूचे बॉक्स होते त्यापैकी 1 बॉक्स महिलांनी फोडला, यावेळी महिलांसह मोठ्याप्रमाणात युवक सहभागी झाले होते. लिंब मध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात देशी दारूची बेकायदेशीरपणे विक्री सुरू आहे. या दारू विक्रेत्यांना रात्रीच्या सुमारास वाहनांतून दारूचा पुरवठा होत असतो.

गेल्या काही दिवसांपासून या दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महिलांनी पाळत ठेवली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास दुर्गादेवीच्या आरती नंतर महिला घरी जातेवेळी त्यांना दारू विक्रेत्यांना दारूचे बॉक्स देतानाच दोघांना पकडले. त्यांच्यासह स्कॉर्पिओ आणि दारूचे बॉक्स महिलांनी ताब्यात घेत पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाला कारवाईसाठी भाग पाडले आहे .

दरम्यान, देशी दारूच्या दहा बॉक्ससह स्कॉर्पिओ गाडी वर शोभा सोनमळे, सत्वशीला पवार, सत्वशीला सोनमळे, सुरेखा घाडगे , मनीषा घाडगे, प्रमिला सोनमळे, योजना तांबे यासह इतर महिला व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होते. यावेळी सोहन सर्जेराव नवले, विजय सर्जेराव नवले रा. आंबवडे ता कोरेगाव जि सातारा यांना पोलिसांच्या ताब्यात महिलांनी व युवकांनी दिले.