नगरसेवकांकडून पालिका कर्मचाऱ्यांना दमदाटी


सातारा : सदरबझार येथे शनिवारी सकाळी नगरसेवक विशाल जाधव यांच्याकडून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याना अरेरावी केली असून यावेळी थंब मशीनही त्यांनी फोडले आहे. या घटनेचा निषेध करत सातारा पालिकेतील सर्व कर्मचारी शहर पोलिस ठाण्यासमोर जमले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, सदरबझार येथे पालिकेतील काही कर्मचारी काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे कामावरून नगरसेवक जाधव यांनी विचारणा केली. शब्दाने शब्द वाढला व त्यातच जाधव यांनी कर्मचाऱ्याना अरेरावी करत दमदाटी, शिवीगाळ केली. तसेच कामासाठी असणारे थंब मशीनची ही तोडफोड त्यांनी केली.

या घटनेची माहिती पालिकेतील कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर त्यानी घटनास्थळी धाव घेतली. मात्र सर्व कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यात जावून नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

No comments

Powered by Blogger.