बदनामी करण्याची धमकी देऊन युवतीवर अत्याचार


सातारा : सोशल मीडियावर अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत कोरेगाव तालुक्यातील एका युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी गोडोली येथील पाच जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.कोरेगाव तालुक्यातील 23 वर्षीय एक युवती व्यवसायानिमित्त सातार्‍यात स्थायिक झाली आहे. या युवतीची ओळख पंचशील शरद कनवाळू (रा. वनरोपवाटिका, गोडोली) याच्याशी झाली. ओळख झाल्यानंतर पंचशील याने युवतीचे वेळोवेळी अश्‍लील फोटो काढले. 

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्या युवतीवर वारंवार अत्याचार केले. यासाठी पंचशील याला शरद कनवाळू, भारती शरद कनवाळू, पद्मशील कनवाळू (सर्व रा. वनरोपवाटिका, गोडोली) आणि कोमल राहुल खलाटे (रा. वाठार) हे मदत करत असत. सप्टेंबर 2016 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत पंचशील कनवाळूने वारंवार त्या युवतीवर अत्याचार करत तिला मारहाण केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments

Powered by Blogger.