आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

पोलीस असल्याचे भासवून युवतीची फसवणूक


कराड : पोलीस खात्यात बाँम्ब स्कॉड व डॉग स्कॉड येथे नोकरीस असल्याचे सांगून वडाप चालकाने कॉलेज युवतीची फसवणूक केली. तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी ३८ हजार रुपये घेऊन तिला गंडा घातला. ही बाब लक्षात येताच संबंधित युवतीने कराड शहर पोलीस ठाण्यात तोतया पोलिसा विरोधात तक्रार दिली आहे. सागर यशवंत बोत्रे (रा. बोत्रेवाडी, कुंभारगाव, ता. पाटण, जि. सातारा) असे पोलिसात गुन्हा नोंद झालेल्या तोतया पोलीस पोलिसाचे नाव आहे. कराड : प्रतिनिधी

पोलीस खात्यात बाँम्ब स्कॉड व डॉग स्कॉड येथे नोकरीस असल्याचे सांगून वडाप चालकाने कॉलेज युवतीची फसवणूक केली. तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी ३८ हजार रुपये घेऊन तिला गंडा घातला. ही बाब लक्षात येताच संबंधित युवतीने कराड शहर पोलीस ठाण्यात तोतया पोलिसा विरोधात तक्रार दिली आहे. सागर यशवंत बोत्रे (रा. बोत्रेवाडी, कुंभारगाव, ता. पाटण, जि. सातारा) असे पोलिसात गुन्हा नोंद झालेल्या तोतया पोलीस पोलिसाचे नाव आहे.