दीड लाख स्ट्रॉबेरीच्या रोपांचे नुकसान


कुडाळ : सनपाने येथील मोहन मारुती पवार व विशाल दुर्गावळे या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतातील लावलेली दीड लाख रुपये किमतीची स्ट्रॉबेरीची रोपांचे अज्ञात इसमाने नुकसान केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.या प्रकारामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी करहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इसम विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

 यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनपाने येथील मोहन मारुती पवार यांच्या शेतात दोन महिन्यांपूर्वी स्वीट चार्ली व इंटर जातीची दीड लाख रुपये किमतीच्या रोपांची लागण करण्यात आली होती. मदर प्लेट असणारी ही रोपे या रोपांपासून पाच लाख रुपये किमतीची रोपे तयार होणार होती. मात्र अज्ञात इसमाने मोहन पवार ही रोपे काढून टाकल्याने नुकसान झाले.

No comments

Powered by Blogger.