विशाल जाधवच करायचं काय या घोषणेणे पालिकेचे प्रवेशद्वार दणाणले


सातारा : सातारा पालिका आरोग्य विभागातील मुकादमास दमदाटी करणाऱ्या सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांच्यावर कारवाई करावी , या मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.सर्व विभागांना कुलूपे लावून सुमारे ३०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. ४० घंटागाड्या प्रभागात न फिरवल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, विरोधी पक्षनेते अशोक मोने, नगरसेवक अमोल मोहिते यांनी आंदोलकांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठींबा देऊन हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित करणार, असे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

विशाल जाधवच करायचं काय.. खाली मुंडी वर पाय, हमारी युनियन..हमारी ताकद, नही चलेगी नही चलेगी..तानाशाही नहीं चलेगी आशा घोषणांनी पालिकेचे प्रवेशद्वार दणाणले. यावेळी पालिका कर्मचारी संघटनेचे चंद्रकांत खंडाईत, गणेश पिसे, सिद्धार्थ खरात, कर्मचारु उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.