माझे लीड कोण तोडणार असेल तर माझी माघार : खा. उदयनराजे


सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे. मला विरोध करणार्‍यांची ताकद किती? याचा विचार पक्षाने करावा. गेल्या वेळचे माझे लीड कोण तोडणार असेल तर आपली माघार असेल. असे उघड आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे. सगळ्यात पक्षात माझे मित्र आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी कार्यालयात झाली. शरद पवार, अजित पवारांसह राष्ट्रवादीची सगळी नेते मंडळी या बैटकीला उपस्थित होती. पक्षाचा नवीन कार्यालयाचा पत्ता माहित नसल्याने खा. उयनराजे भोसले हे या बैठकीला उशीरा पोहचले. 

त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनतर माध्यमांशी बोलताना खा. उयनराजे म्हणाले, शरद पवार साहेबांचे आशिर्वाद घेतले. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे. शरद पवार साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मात्र, बैठकीमध्ये आपला विरोध करणार्‍यांची ताकद किती आहे हे पक्षाने पाहिले पाहिजे. उमेदवारी मागण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. गेल्या वेळेला मला मिळालेले मताधिक्य पक्षाने लक्षात घेतले पाहिजे. माझे लीड तोडणारा कोण असेल तर माझी माघार असेल, असे उघड आव्हान उदयनराजेंनी दिले. त्याचवेळी अनेक पक्षातील आमदार व खासदार माझे मित्र आहेत असा सूचक इशाराही त्यांनी दिला. आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा मला विरोध नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

No comments

Powered by Blogger.