Your Own Digital Platform

शिरवळ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर चिंतन परिषद् संपन्न


लोणंद : सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर आणि खंडाळा तसेच सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान पुरंदर यांच्या संयुक्त विदयमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज चिंतन परिषद आयोजित करण्यात आली होती.

 यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे आदि महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन हे साहित्यिक क्षेत्रातील डॉ रजिया पटेल शाहिर संभाजी भगत, डॉ तुकाराम रोंगटे उपप्राचार्य प्रकाश पवार, प्राचार्य सुरेश खराते, सरपंच वंदना कडाळे ,आनिष शशुद्दीन खान, प्राचार्य डॉ प्रसन्नकुमार देशमुख पंकज धिवार आदि मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले समाज चिंतन परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि अल्पसंख्याक ,आदिवासी समाज , मातंग समाज, चर्मकार समाज, ओबीसी समाज भटके विमुक्त समाज तसेच भारतीय संविधान आणि सध्याची सामाजिक स्थिती आदि विषयांवर विचार मंथन करणारी भाषणे ही वेगवेगळ्या वकते यांच्या कडून करण्यात आली.

तसेच आंबेडकरी समाज चिंतन आणि चिकित्सा या लिहीलेल्या डॉ रोहिदास जाधव ,पंकज धिवार, महादेव कांबळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले .उदघाटन प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि अल्पसंख्यांक या विषयावर बोलताना डॉ रजिया पटेल म्हणाल्या की मुस्लिम लोक ही या देशाचे नागरिक आहेत आज ही मुस्लिम लोकांना नक्षली म्हटले जाते आहे देशाच्या उभारणीत ही मुस्लिम यांचे योगदान आहे देशाच्या एकतेसाठी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण हा बदलायला हवा. 

यावेळी शाहीर संभाजी भगत म्हणाले की आपली चळवळ ही विघटना च्या दिशेने जाते आहे जोपर्यंत आपण योग्य संघटन करायला शिकणार नाही तोपर्यंत जो उभारलेला लढ़ा आहे तोपर्यंत त्यामध्ये यश मिळणार नाही.

तुकाराम रोंगटे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनीतून उद्यास आलेल्या भारतीय संविधानामुळेच आज चा आदिवासी समाज हा जंगलातून बाहेर पडून हातात पेन घेऊन शिक्षण घेतो आहे.

मातंग समाजाच्या उद्धारासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील विविध भागांतून मातंग परिषदा घेतल्याचे डॉ.शरद गायकवाड यांनी सांगितले.

जेष्ठ विचारवंत श्रावण देवरे म्हणाले की ओबीसी समाजाच्या न्याय हक्का ची मागणी मान्य न झाल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

संत रोहिदास यांच्या बरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर हा चर्मकार समाजातून होत असल्याचे डॉ कैलास सोनवणे यांनी सांगितले.

ब्रिटिश यांच्या कारकिर्दीत ज्या भटक्या विमुक्त या समाजातील लोकांवर गुन्हेगारी चा शिक्का पडलेला होता त्याच लोकांना राज्यघटनेच्या माध्यमांतून माणुसकी मिळवून देण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असे डॉ नारायण भोसले यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या समारोप वेळी रतनलाल सोनग्रा यांनी अध्यक्षीय भाषण केले चिंतन परिषदेचे सूत्रसंचालन छाया जावळे आणि सुजाता भालेराव यांनी केले.