फलटण येथिल बिरोबा यात्रेत मेढपाळांनी भरला घोड्यांचा बाजार


आदर्की : सातारा जिल्हाच्या पुर्व भागात दुष्काळी परिस्थिती मुळे चारा - पाणी प्रस्न निर्माण होणार
असल्याने सालपे ता . फलटण येथिल बिरोबा यात्रेत मेढपाळांनी घोडे बाजारातुन पाच ते वीस हजार रुपायांची  किंमत करून चार तासात कोटयावधी रुपायाची उलाढाल झाली सालपे ता . फलटण बिरोबा यात्रा धनगर समाज व मेंढपाळ उत्तर प्रदेश , कर्नाटक , मराठवाडा , नाशिक , मान देश , खानदेशातून मेंढपाळ आपल्या कुंटुबासह येतात , बिरोबा मंदीरात रांगा लावुन दर्शन घेतात व भंडार्या ची उधळण करित गज नृत केले जाते. मेंढपाळ वर्ग तलली न नाचत होते. बिरोबा मंदीराच्या अडीच एकर जागेत घोडे बाजार सकाळी सात वाजता सुरु होवुन कर्नाटक , उत्तर प्रदेश , खानदेश , सोलापूर , सातारा जिल्हातून हजारो घोडे विक्रीसाठी आले होते.

यावर्षी मेंढपाळ व्यवसाय करणार्या सातारा , पुणे , सोलापुर , सांगली व अन्य जिल्हात दुष्काळी परि|स्थिती निर्माण होवुन चारा व पाण्याचा गंभीर प्रस्न निर्माण होणार असल्याचे चित्र दिसत असल्याने प्रती वर्षी दसरा सण साजरा करून मेंढपाळ लोककोकणात जातात पण गावाकडे पाणी _चारा उपलब्धअसला तर कोकणात  मेंढपाळ कमी प्रमाणात जातात पण या वर्षी मेंढपाळ व्यवसाय करणारया भागात दुष्काळी परिस्थिती असल्या ने सर्व मेंढपाळ कोकणात जाणार असल्याने गावापासून कोकणात जाण्यासाठी घोsयाची आवश्यकता असते कारण जातात संसार उपयोगी वस्तू , धान्य , कोंबड्या , कुत्री ,लहान मुले घोडयावर बसवुन न्यावी लागतात तर कोकणात गल्यावरही प्रत्येक शेतक२याच्या बांधावर जाण्यासाठी घोडयाचा वापर करावा लागत असतो त्यामुळे सालपे येथिल घोडयाच्या बाजारात हजारो घोडे विक्रीसाठी आले पाच ते वीस हजाराच्यावर घोंडयाची किंमत होवुन कोटयावधी रूपायाची उलाढाल चार तासात झाली मेंढपाळ लोंकाना दैनदिन लागणारया घोंगडी , जान , ब्ले केट , कुराड , दांडे , बटवे , चपला , शाल, आदीची खरेदीही मोठया प्रमाणात झाली.


बिरोबा यात्रेत येणा२या भाविकांची व घोडी , बकरी यांची पाण्याची सोय देवस्थानने केली होतीमंदीर परिसर लोणंद - वाठार स्टेशन रस्त्यावर असलेने लोणंद पोलीस स्टेशन चे सपोनि दिघावकर व गणेश पवार व कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवुन वाहतुक सुरळीत सुरू ठेवली होती. भाविकांनी समाधान व्यक्त केले.

No comments

Powered by Blogger.