Your Own Digital Platform

सायकलवरुन पडून बालिकेचा मृत्यू


परळी : परळी खोर्‍यातील कुस बुद्रुक येथील बालिका शाळेतुन घरी येत असताना सायकलवरून पडली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.

कुस बुद्रूक येथील श्रध्दा राजेंद्र लोटेकर (वय - 9) ही जि. प. प्राथमिक शाळा कुस-बनघर येथे शिकते. श्रध्दा ही शाळा सुटल्‍यावर सायकलवरुन घरी जात असताना सायकलीवरून पडली. यावेळी तीच्या डोक्याला मार लागला होता. त्यातून ती सावरली व मैत्रिणी बरोबर घरी आली. पण तिने झालेल्या घटनेची माहिती आपल्या कुटूंबियांना भितीपोटी दिली नाही. त्यानंतर सोमवारी नेहमी प्रमाणे ती शाळेत गेली. शाळेत तिला उलटय़ांचा त्रास झाल्यावर शिक्षकांनी तीला घरी पाठवले. 

घरी आल्यावर तिच्या आई वडिलांनी तिला परळी येथे खाजगी दवाखाण्यात औषोधोपचार केले. तिथून परत गजवडी येथे खाजगी औषोधोपचार घेतले. तिथेही प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने सातारा व पुणे येथे अधिक औषोधोपचारासाठी हलवण्यात आले. पुणे येथे उपचारा दरम्यान मात्र तिला मृत्यूने कवटाळले.श्रध्दाचे आई वडील मोलमजूरी करतात. त्यांना अजून एक मुलगा श्रेयश (वय-12) हा इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे. श्रध्दा ही शाळेत व गावात आपल्या मनमिळावू स्वभावाने सर्वांची लाडकी होती. शाळेतील तसेच गावातील कला पथकात, सांस्कृतीक कला व क्रिडा क्षेत्रात तिचा उत्स्फूर्त सहभाग असायचा.

 शाळेतील अभ्यासात चुनचुनीत असल्याने सर्वांचा तिच्यावर विशेष लळा होता. श्रध्दाच्या मृत्यूची वार्ता कुस बुद्रुकमध्ये समजताच कुटूंबियांनी तसेच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.