कराडात चिमुकलीला कारने चिरडले


कराड : येथील सोमवार पेठेतील पंताचा कोट परिसरात एका सहा वर्षाच्या चिमुकलीला कारने चिरडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. कार चालक मोबाईलवर बोलत होता आणि त्यामुळेच त्याचा चालकाचा ताबा सुटल्याचा दावा नातेवाईकांसह नागरिकांनी केला आहे.

सई सचिन वाडेकर (वय 6) असे त्या दुदैवी चिमुकलीचे नाव आहे. ती आपल्या एका मैत्रिणीसोबत सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घराशेजारील अंबाबाई मंदिर परिसरात रस्त्याकडेला उभी राहिली होती. याचवेळी एक चालक मोबाईलवर बोलत कार चालवत होता. अंबाबाई मंदिराजवळ वळण असल्याने मोबाईल बोलणार्‍या चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कारची सईला धडक बसली. धडकेनंतर काही अंतरापर्यंत कारने सुईला अक्षरश: फरफटत नेल्याचे नागरिकांनी पोलिसांना सांगितले आहे.

अपघातानंतर चालकाला उपचारासाठी कराडच्या सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी शहर पोलिसही रूग्णालयात गेले होते. त्यामुळे रात्री उशिरा याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे बोलले जात आहे.

No comments

Powered by Blogger.