शेरीचीवाडी शाळेत रंगला आठवडा बाजार


आरडगांव : जि.प.शाळा शेरीचीवाडी (हिंग) शाळेत "आठवडा बाजार " हा उपक्म शनिवार दि. 20/10/2018 रौजी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत भरविण्यात आला होता. मुलांच्या उपजत व सुप्त गुणांना वाव मिळावा , त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, विक्री कौशल्य वाढावे, व्यवहारज्ञान समजावे, शिक्षणाची व व्यवहाराची सांगड घालता यावी अशा विविध विचारांनी मुख्याध्यापक संजय शिंदे गुरुजी यांनी "आठवडा बाजाराची संकल्पना शाळा व्यवस्थापन समिती पुढे मांडली व त्यास त्यांनी सहमती दर्शविल्याने हा उपक्रम यशस्वी झाला बाजारामध्ये मुलांनी तयार केलेल्या दिवाळीसाठीच्या कलात्मक पणत्या , खाऊगल्ली मध्ये वडापाव, भजीपाव , शाबूदाणा वडा, समोसा , पँटीस, मच्युरियन, मिसळ पाव , ओली भेळ, खारे शेंगदाणे , भाजलेल्या शेंगा, चुलीवरील चहा,फँशन फ्रुट चा सरबत, शेंगदाणा चिक्की , फळ बाजारात चिक्कू , सिताफळ ,बोरं, पेरु,आवळा , मका कणीस इ. चे विविध स्टाँल मांडण्यात आले होते.

भाजीपाला बाजारात भेंडी, गवार, भोपळा, देशी अंडी , मूळा, भोपळा , डेसा, गवारी , मेथी , मिरची, पालक, शापू, हादगा, घेवडा, वांगी,टोमँटो,शेवगा शेंगा, लिंबू ,लसूण , कांदे , बटाटे तसेच किराणा मालामध्ये डाळी व सर्व कडधान्ये तसेच किरकोळ किसर्व किराणा, वेफर्स, कुरकुरे, भडंग असाच भरपूर माल विक्री साठी मांडण्यात आला होता.

 त्यातून सुमारे 50000/- रुपयांची उलाढाल येवड्याशा छोट्या गावात झाली.. "आठवडा बाजारास"पंचायत समिती ,फलटण सभापती मा.सौ. प्रतिभाताई अरविंद धुमाळ व जि.प.सदस्य ,मा. धैर्यशील अनपट बापू, मा. अरविंद सुभाषराव धुमाळ (राजाभाऊ) यांनी भेट देऊन मुलांचे कौतुक केले व पाठीवर शाबासकीची थाप टाकली. यावेळी जि.प.सदस्य मा. धैर्यशील अनपट बापू , मा.अरविंद धुमाळ (राजाभाऊ) ,मा.जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष व्यसनमुक्त युवक संघ , सातारा जिल्हा, केंद्रप्रमुख प्रमिला रणवरे मँडम, खाशीबाई धायगुडे मँडम, मा.अर्जुन भोईटे,माजी शिक्षणविस्तार अधिकारी हिंगणगाव , पञकार बंधू, तसेच तरडगाव बीटातील सुमारे 150 शिक्षक, शेरीचीवाडी चे सरपंच शामराव कणसे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जीवन शिंदे व सर्व सदस्य , सौ.ज्योती धुमाळ ताई , रणजित गायकवाड ,पोलिस पाटील प्रथमेश सूर्यवंशी , दिलीप मोरे पाटील, शिवाजीराव घाडगे, गायकवाड गुरुजी तसेच सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी मधुकर शिंदे, सुनिल बोडके, तुकाराम कदम संचालक शिक्षक बँक, उत्तम निंबाळकर गुरुजी, सतिश जाधव गुरुजी व किशोर चांदगुडे गुरुजी यांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले .

No comments

Powered by Blogger.