आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

कार अपघातात एक ठार ; दोन जखमी


ओझर्डे : दिवाळीचे साहित्य घेऊन येणार्‍या एका कारला वाई तालुक्यातील वाई-सुरुर या रस्त्यावर अपघात झाला. ही कार झाडावर आदळल्याने यामधील एक जण जागीच ठार झाला तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.याबाबत प्रमोद फणसे (रा. दादर परेल ), राजेंद्र मनोहर धोत्रे (रा. महाबळेश्वर) आणि विजय कुमार वर्मा हे तिघे मुंबईहून महाबळेश्वर येथे दिवाळीचे साहित्य घेऊन निघाले होते. गुरुवारी सकाळी ते वाई-सुरुर रस्त्यानजिक आले असता चालक धोत्रे याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी एका झाडावर जाऊन आदळली.

यामघ्ये गाडीतील प्रमोद फणसे जागीच ठार झाले तर राजेंद्र धोत्रे व विजय वर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वाईच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.