Your Own Digital Platform

तीन लाखांचे काजू खरेदी करून ठग पसार


सातारा : कोडोली येथील होलसेल किराणा दुकानातून 3 लाख रुपयांचे काजू खरेदी केल्यानंतर त्याचा चेक बाऊन्स झाल्यामुळे एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती अनोळखी असून, त्याचा आता संपर्कही होत नाही. त्यामुळे दुकानदार धास्तावला असून संशयिताचा शोध घेण्याचेे पोलिसांपुढे आव्हान आहे.

कुमार बाळासाहेब चव्हाण (रा. कर्मवीरनगर, कोडोली) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांचे मोरया मेगा मार्ट नावाचे होलसेल किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानात दि. 5 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फसवणूक करणारी संबंधित अनोळखी व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीने चव्हाण यांना मोठ्या प्रमाणात काजू आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार चव्हाण यांनी त्याला दुकानात असणारे काजूचे विविध प्रकार दाखवले. यापैकी एका प्रकारच्या काजूची निवड करत त्या व्यक्तीने चव्हाण यांच्याकडून 3 लाख 2 हजार रुपये किमतीचे 380 किलो काजू खरेदी केले होते.