पै .खाशाबा जाधव कुस्ती संकुलास मिळाली ९५ गुंठे जागा


कराड : गेल्या दोन दशकांपासून रखडलेल्या कराड तालुक्यातील ऑलिंम्पिकवीर पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाचा मार्ग सुकर झाला आहे. या संकुलासाठी राज्य सरकारकडून एक कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. गोळेश्वरयेथील स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी संकुलासाठी ९५ गुंठे जासातारा जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी याबाबतची माहिती दिली कि, गोळेश्वरमधील जागेची लवकरच मोजणी होणार असून शासनाकडून जागेचा ताबा मिळाल्याचे पत्रही जिल्हा क्रीडा कार्यालयास मिळाले आहे.

 जिल्हाधिकारी, कराडचे तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांचीही लवकरच बैठक होणार असल्याची माहिती निकम यांनी यावेळी दिली आहे.

गेल्या वर्षी खाशाबा जाधव यांचे ऑलिम्पिक पदक लिलावात काढल्याचे रणजित जाधव यांनी जाहीर केले होते. त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आहे. कै. खाशाबा जाधव यांचे चिंरजीव रणजित जाधव आणि ना. डॉ. अतुल भोसले यांनी ना. विनोद तावडे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाणही हेही या बैठकीला हजर होते. त्यानंतर आता जागा ताब्यात मिळाल्याचे पत्र मिळाल्याने ऑलिंम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या कुस्ती संकुलाचा मार्ग सुकर झाला आहे.गा मिळाली आहे.

No comments

Powered by Blogger.