उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह सुमारे ७५ जणांवर गुन्हे दाखल


सातारा: शहरातील आमदार समर्थक नगरसेवक रवि ढोणे यांचे जुना मोटार स्टॅण्ड परिसरातील दारूचे दुकान काढण्यावरून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे, आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्यात झालेल्या वादावादीवरून दोन राजेसह 70 ते 75 कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. तर नगरसेवक रवी ढोणे यांच्या फिर्यादीवरून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंसह 5 ते 6 समर्थकांवर दुकान तोडण्याची धमकी देणे, दमदाटी करणे अशा आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

No comments

Powered by Blogger.