चोरट्या वाळू वाहतूकप्रकरणी २० डंपर जप्त


ओझर्डे : वाई तालुक्यात विविध ठिकाणी विनापरवाना वाळू वाहतूक करणारे तब्बल 20 डंपर वाई तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पकडले असून, त्यांच्याकडून 15 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे बेकायदा वाळू उपसा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.वाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा व विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती वाईचे तहसिलदार रमेश शेंडगे यांना मिळताच त्यांनी मंडलाधिकारी आणि तलाठी यांना बरोबर घेवून गेल्या दोन दिवसात वाई तालुक्यातील विविध रस्त्यांवर गस्त घालत विनापरवाना वाळू वाहतूक करणारे तब्बल 20 डंपर पकडले. ही जप्त केलेली वाहने वाई व भुईंज पोलिस ठाण्यामध्ये लावण्यात आली.

दंडात्मक कारवाई झालेली चालक-मालक व वाहने याप्रमाणे - प्रमोद अनपट (डंपर क्र एमएच 11 बीडी 1900), विरसिंग बांगल (डंपर क्र एम एच 11 एल 5247), राजेंद्र ढेकळे (डंपर क्र एम एच 11 ए एल 4676), संग्राम संकपाळ (डंपर क्र. एम एच 11 सी एच 7372), भाऊ हणमंत खरात (डंपर क्र. एम एच 11 बी 8525), राहुल हिरामन पवार (डंपर क्र. एम एच 11 सी एच 5667), शंकर आनंदराव सावंत (डंपर क्र. एम एच 11 सी एच 2149), सागर दिलिप जाधव (डंपर क्र. एम एच 11 सी एच 970), विशाल सुनील घोलप (डंपर क्र. एम एच 11 सी एच 5247), रोहिदास पोपट खताळ (डंपर क्र. एम एच 27 एक्स 4293), तन्वीर दस्तगीर मणेर (डंपर क्र. एम एच 11 जी 3039), संतोष सुरेश चौधरी (डंपर क्र. एम एच 0 एल एच 7743) गुन्हा दाखल. जेसीबी जप्त विलास नामदेव सावंत (डंपर क्र. एम एच 11 ए एल 1318), किरण बाळू जाधव, अनिल चव्हाण (डंपर क्र. एम एच 11 सी एच 9099), विकास संजय अनपट (डंपर क्र. एम एच 11 सी एच 3367), अक्षय जयवंत पिसाळ (डंपर क्र. एम एच 11 बी के 4723). याप्रकारे 20 वाहने जप्त करुन दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. राजकीय लोकांनी याप्रकरणी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही सरकारी कामात हस्तक्षेप केल्यावरुन 353 कलमानुसार फौजदारी कारवाई करण्याचा इशारा तहसिलदारांनी दिला आहे.

No comments

Powered by Blogger.