Your Own Digital Platform

सातारा एलसीबीचे नवे ऑफिसर कोण ? घोलप, कुंभार यांच्या नावाची चर्चा


सातारा : गेली चार वर्षे सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात (एलसीबी) पोलीस निरीक्षक पदावर राहिलेले पद्माकर घनवट यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली. अचानक झालेल्या बदलामुळे या विभागासह पोलीस दलात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या झालेल्या इलतापालतीमुळे आता या विभागात पोनि अण्णासाहेब घोलप पोनि विजय कुंभार की आणखी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांनी बुधवारी रात्री पुणे ग्रामीण येथील सातारा एलसीबीचे पोनि पद्माकर घनवट यांच्या बदलीचे आदेश काढले. पोनि पद्माकर घनवट यांनी आपल्या कार्यकाळात सहकाऱ्यांच्या मदतीने सातारा एलसीबीचा दबदबा निर्माण केला. अनेक क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करून बेधडक कारवाई केल्या आहेत.

दरम्यान, सातारा पोलीस दलात चारच दिवसापूर्वी पुन्हा पोनि अण्णासाहेब घोलप रुजु झाले आहेत. त्यांनी यापूर्वी सातारा शहर पोलीस ठाण्यात २ वर्षे व फलटण शहर पोलीस ठाण्यात २ वर्षे अशी जिल्ह्यात ४ वर्षे सेवा केलेली आहे. सध्या पोलीस मुख्यालयात त्यांची नियुक्ती आहे. तसेच सोलापूर ग्रामीण येथून पोनि विजय कुंभार यांची सातारा येथे बुधवारी बदली झाली आहे. यामुळे सातारा एलसीबीसाठी या दोघांपैकी एकाची वर्णी लागणार की आणखी तिसरे कोणते नाव समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे