आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

पोलिसाच्या डोक्यात घालणाऱ्याला अटक


कराडः चहाच्या टपऱ्या का बंद केला?, अशी विचारणा करत हिस्ट्रीशिटरने पोलिसाच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये डोळ्याला व कपाळावर गंभीर जखमी होऊन पोलीस रक्तबंबाळ झाला. गुरुवार दिनांक १ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी हिस्ट्रीशीटरला अटक केली आहे.अनिल नारायण गायकवाड (रा. बुधवार पेठ, कराड) असे पोलिसाला दगडाने मारहाण करणाऱ्या संशयित हिस्ट्रीशिटरचे नाव आहे. तर सागर संजय काटे (वय ३०) असे जखमी पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सागर काटे व खाडे हे दोघेजण गुरुवारी रात्री कराड बसस्थानक परिसरात ड्‍यूटी बजावत होते. यावेळी ते बस स्थानक परिसरातील चहाच्या टपऱ्या बंद करून नवग्रह मंदिरासमोर उभा होते. त्यावेळी तेथे अनिल गायकवाड आला. त्याने सागर काटे याला चहाच्या टपर्‍या बंद का केला?, तु मला ओळखतो का?, माझ्यावरही पाच - सहा गुन्हे दाखल आहेत, असे म्हणून लागला. त्यावेळी सागर काटे यांनी मी तुला ओळखतो, तु हिस्ट्रीशिटर आहेस, येथून जा, असे सांगितले.

त्यानंतर अनिल गायकवाड तेथून जात असताना तो सागर काटे यांना शिवीगाळ करू लागला. तसेच काही अंतरावर गेल्यानंतर अनिल गायकवाड यांने दगड उचलून संजय काटे यांना फेकून मारला. तो दगड काटे यांच्या डोळ्यावर व कपाळावर लागल्याने रक्तबंबाळ झाले. यावेळी काटे यांच्याबरोबर ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचारी खाडे यांनी अनिल गायकवाड याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, अंधाराचा फायदा घेऊन तो बस स्थानकाच्या दिशेने पळून गेला. त्यानंतर खाडे यांनी जखमी सागर काटे यांना उपचारासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी संशयित अनिल गायकवाड याला अटक केली आहे.