कोपर्डेत स्वाभिमानीने ऊस वाहतुकीचे ट्रँक्टर अडवले


कराड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत जाहीर केल्याप्रमाणे कराड तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर न करता ऊस तोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोपर्डे हवेली गावच्या हद्दीत दोन साखर कारखान्यांची ऊस वाहतूक करणारी वाहने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे राज्य कार्यकारणी सदस्य अनिल घराळ यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी अडवली.

गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे यांनी साखर कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना मागणीप्रमाणे ऊस दर जाहीर करावा अन्यथा ऊस तोड रोखू असा इशारा पत्रकाद्वारे दिला होता. त्यानंतर बनवडी येथे सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याची सुरु असणारी ऊस तोड बंद पाडत ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अडवण्यात आला होता. 

त्यावेळी या कारखान्यासह अन्य कारखान्यांनी ऊस तोड तरी थांबवावी, अन्यथा उसाचा दर जाहीर करावा अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतरही कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कोपर्डे हवेली येथे वाहने अडवली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

No comments

Powered by Blogger.