Your Own Digital Platform

राजुरी सोसायटी भागधारका मध्ये कही खुशी ... कही गम


राजुरी : राजुरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चा सन २०१८ या अर्थिक वर्षाचा लाभांश सभासदांना आठ टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात येत आहे , मात्र इतरही तिन नविन सोसायट्या नेत्यांच्या नेत्त्तृत्वाखाली निर्माण केल्या असताना त्यांचा लाभांश वाटप का होत नाही , तो व्हावा अशी मागणी संबंधीत विकास सेवा सोसाटीचे भागधारक तून होत आहे.त्यामुळे राजुरी परिसरामध्ये सोसायटी भागधारका मध्ये कही खुशी कही गम असलेचे चित्र दिसत आहे . लाभांश वाटप न मिळालेल्या भागधारकाची दिवाळी थोडीशी कडवटच होणार आहे ? अशी चिन्हे आहेत.

राजुरी गावाकडे फलटण तालुक्यातील राजकिय , सामाजिक , कौटुंबिक , विकसनशील वारसा लाभलेले गाव म्हणून पाहिले जाते. राजुरी गावच्या मध्य भागातुन निरा उजवा कालवा व उत्तरेकडुन संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आंळदी पंढरपूर महामार्ग गेल्याने येथील भाग सुजलाम् सुफलाम् बनला आहे . गावात रोजची लोखोची उलाढाल होत असते , येथील ८५% लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे , राजकारणाचे धडे गिरवायचे - शिकायचे असतील तर राजुरीत जाऊन रहावे असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही .असा राजकीय वारसा लाभलेल्या राजुरी गावात राजुरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आठ टक्के प्रमाने सभासदांना लाभांश वाटप करत आहे.

परंतु राजकिय फायद्यासाठी गावचे तिन गब्बर नेत्यांच्या नेत्त्तृत्वाखाली भैरवनाथ विकास सोसायटी , हनूमान विकास सोसायटी व श्रीराम विकास सोसायटी अशा तिन-तिन नविन विकास सोसायट्या निर्माण केल्या परंतु त्यांचा लाभांश मिळत नसुन तो मिळावा असी चर्चा संमधित विकास सेवा सोसाटीचे भागधारक व परीसरातील नागरीकामधून मागणी होत आहे . लाभांश वाटप येणारी दिवाळी गोड जावी अशी अपेक्षा आहे.