तहसीलदारांकडून जप्‍त वाळूचा तिसर्‍या मंगळवारी लिलाव

सातारा : बेकायदा वाळू उपसा व उत्खनन करणार्‍यांवर कारवाई करून जप्‍त केलेल्या सुमारे 15 ब्रास वाळू साठ्याचा लिलाव दि. 15 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार असल्याचे सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी जाहीर केले. या लिलावास सातारा प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी मान्यता दिली आहे. दरम्यान, जप्‍त केलेल्या वाळूचा महिन्याच्या प्रत्येक तिसर्‍या मंगळवारी लिलाव काढण्यात येणार आहे.सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी बेकायदा वाळूप्रकरणी मोठ्या कारवाई केल्या.

या कारवाईत वाळू उपसा व उत्खनन करणारी वाहनेही ताब्यात घेतली. वाहनांतील जप्‍त केलेली वाळू तहसील कार्यालय परिसरात ओतण्यात आली असून या वाळूचा लिलाव करण्यात येणार आहे. वाळूसाठा, अपसेट किंमत तसेच लिलावाच्या अटी व शर्ती पाहण्यासाठी तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत व लिलावाच्या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या मंगळवारी सकाळी 11 वाजता जप्‍त वाळूचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलाव प्रक्रियेत सहभागी होवू इच्छिणार्‍यांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन नीलप्रसाद चव्हाण यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.