दिवाळीच्या शुभेच्छापत्रांना सातारकरांची पसंती


सातारा : सध्याच्या डिजिटलायझेनमुळे मोबाईल, सोशल नेटवर्कींगमुळे ऑनलाईन दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा ट्रेंड आहे. मात्र, या जमान्यातही जुन्या जाणत्या लोकांकडून दिवाळीचा शुभसंदेश पोहोचवण्यासाठी नागरिकांकडून शुभेच्छापत्रांना पसंती दिली जात आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतला शुभेच्छांचा मजकूर असलेल्या ग्रिटीग्जंना सर्वसामान्य ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे.दिपावलीच्या तयारीसाठी सर्वत्रच अबालवृध्दांची लगबग सुरु झाली आहे.दीपावली म्हणचे साक्षात आनंद आणि उत्साह आपल्या आवडत्या व्यक्ती , नातेवाईक, स्नेही यांना ग्रिटींग पाठवतो हा एक आनंदोत्सवाचा भाग असतो. 

त्यामुळे सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत मोनार्च , आर्चिस, हॉलमॉर्क, बादशहा, क्राय, हेल्पेज यासह विविध कंपन्यांची ग्रिटींग्ज विक्रीसाठी आली आहेत. दिवाळी या एकाच शब्दात, जीवनाचं सारं मांगल्या सामावलंय जणू, पणत्याचं तेज, कंदिलाची शोभा, रांगोळ्याचं सौंदर्य, आकाशातली रोषणाई आणि मनामनातून उमलणारी फूलं, हीच शुभेच्छांची फुलं’, ‘तेवत्या पणत्यांनी तेजाची आरास मांडावी. शुभ दिपावलीच्या स्वागतासाठी रांगोळीही बहरुन जावी. दिपावलीच्या पहाट वार्‍यात संदेश असावा समृध्दीचा, तसेच घराघरात दीप उजळावा आकांक्षाचा, तृप्तीचा समाधानाचा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, दु:खाचे दीप जाळून सुखाचा प्रकाश पडो, मनातील सर्व इच्छा लक्ष्मीच्या अशिर्वादाने पूर्ण होवो’ असा मजूकर असलेली विविध ग्रिटींग्ज तरूणाईंना भुरळ पाडत आहेत.

अध्यात्मापासून कवितेपर्यंत नेमक्या शब्दात शुभेच्छा व्यक्‍त करणारी शुभेच्छापत्रके लक्ष वेधून घेत आहेत. डिजिटलायझेनमुळे व्हॉटस्अप आणि फेसबुकमुळे समाजमाध्यमांमध्ये लक्षणीय क्रांती झाली असली तरी ग्रिटींग्जद्वारे भावना व्यक्त करण्याची ओढ आजही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. इंटरनेट व मोबाईल, सोशल नेटवर्कींगच्या जमान्यातही ग्रिटींग्जला चांगली मागणी आहे. जल्लोष, उत्साह, नवलाइ, सृजनतेचा, नात्यातीला, सौख्याचा आनंद अशाप्रकारे मराठी भाषेतील मोजक्या शब्दात दिवाळीचा व्यक्त होणार्‍या भावनांमुळे मराठी ग्रिटींग्जला चांगली पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

लक्ष लक्ष दिव्यांनी, घेवूनी येवो नवी, उजाळी ही दिशा, उमेद नवी अशा, दिपावलीच्या शुभेच्छापत्रांचे मुखपृष्ठ जरी आकर्षक असले तरी त्यातील मजकूर आपल्या भावना मित्र -मैत्रीणींना पोहोचवण्यासाठी नेमक्या शब्दात आणि विशेष करून मराठीत आहे का? हे ग्राहक ग्रिटींग्ज खरेदी करताना कटाक्षाने पहात आहेत. घरोघरी, दारोदारी, दीपावलीचा आनंदोत्सव, मनामनातून सार्‍यांचा आज आनोखा हर्षोत्सव, चला पेटवा दीप नवे स्नेहाचे अन उत्साहाचे, मनोमनी, सार्‍यांचा राहो नाते हे मांगल्याचे शुभ दिपावली.. अशा ग्रिटींग्ज खरेदीकडे अबालवृध्दाबरोबर , महिला नागरिकांसह तरूणाईचा कल वाढला आहे. 20 रूपयापासून 300 रुपयांपर्यंत ग्रिटींग्ज आहेत.शुभेच्छापत्र उघडताच आत असलेल्या हार्ट शेपमध्ये लाईट लागून संगीत लागणार्‍या शुभेच्छापत्रकांना तरुणाईतून जास्त मागणी आहे. यामध्ये हेल्पेज इंडिया, क्राय, युनिसेफ आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने बनविलेल्या शुभेच्छापत्रांना पसंती दिली जात आहे. शहरातील पोवईनाका, राजपथ, मोती चौक, कॉलेज परिसर व पुस्तकांच्या दुकानात ग्रिटींग्ज विक्रीसाठी आली आहेत.

No comments

Powered by Blogger.