मारहाणप्रकरणी ६ जणांवर गुन्हा


खंडाळा : किरकोळ अपघाताच्या कारणातून पारगाव येथील हॉटेल मयूरचे चालक व मॅनेजर यांना मारहाण करून चेन व 31 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तसेच हॉटेलमधील साहित्याच तोडफोड करत दहशत माजवली. याप्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पारगाव - खंडाळा बसस्थानका शेजारी मयूर हॉटेलसमोर फिर्यादी सुधीर प्रकाश जाधव हे स्कॉर्पिओ गाडी हॉटेलकडे डाव्या बाजूस वळवत होते. 

त्याच वेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीची गाडीला धडक झाली. या रागातून दुचाकी चालक विकी मिसाळ व सूरज सपकाळ यांनी सुमित गायकवाड, सनी छपरी, संतोष माने, अशोक साळवी व अन्य दोन साथीदारांना बोलावून घेतले. यानंतर या सर्वांनी हॉटेलचालक सुधीर जाधव व मॅनेजर संजय सखाराम भारमल यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

No comments

Powered by Blogger.