कराडात अल्पवयीन मुलीवर शस्त्राने वार


कराड : अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले. कॉटेज हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी (दि. 4) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, संबंधित मुलीवर वार करणारा संशयित युवक गायब झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस त्याचा शोध घेत होते. येथील शिवाजी स्टेडियम परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यामध्ये तिच्या हातावर व गळ्यावर वार झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्‍तस्राव झाला आहे. घटनास्थळी फरशीवर रक्‍ताचे डाग पडले आहेत.

 संबंधित अल्पवयीन मुलगी तशाच परिस्थितीत घरातून बाहेर पळत आल्याने हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. नातेवाईकांनी मुलीला उपचारासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलविले. तेथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मुलीवर वार करणारा संशयित युवक गायब असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. डीवायएसपी नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी संशयिताच्या तपासासाठी पोलिसांना सूचना केल्या. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसात नोंद करण्याची कार्यवाही सुरू होते.

No comments

Powered by Blogger.