आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

किसनवीर सातारा जिल्ह्याचे खरे लोकवीर : घोरपडे


सातारा : महात्मा गांधीजीनी पुकारलेल्या मिठाच्या सत्याग्रहात 1939 साली किसनवीर आबांना ब्रिटिश सरकारने अटक केली होती. अटकेनंतर 6 महिन्यात सुटल्यानंतर खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यात अहिंसावादी पध्दतीने लढा चालू झाला. त्या लढ्यात किसनवीर आबांचे योगदान खूप मोलाचे असून, ते सातारा जिल्ह्याचे खरे लोकवीर होते. असे प्रतिपादन जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक व प्रतिसरकारच्या रहिमतपुर गटाचे प्रमुख सोपानराव घोरपडे यांनी व्यक्त केला.

 हुतात्मा स्मारक येथे आयोजित अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.संपूर्ण देशाला अभिमानास्पद असे स्वातंत्र्य चळवळीत प्रतिसरकार व त्यात निधड्या छातीने सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य आहे. सन १९४२ सालीच्या 'चले जाव चळवळीचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. सातारा जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशभक्त किसन वीर यांनी त्याच्यासह पाच सहकाऱ्यांनी येरवडा कारागृहातून पलायन केले या घटनेला आज दि. १ नोव्हेंबर २०१८ रोजी ७५ वर्षे पुर्ण झाले असल्याने हा कार्यक्रम आज सातारा येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आला असल्याचे सांगत, त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुढील वर्षी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या कार्यक्रमास कॉ. किरण माने, बाळासाहेब वीर, विजय मांडके, बाळासाहेब शिरसट, शाहीर सोनवणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यप्रेमी नागरिक, युवक आदी उपस्थित होते.