दत्ता जाधवला अटक


सातारा : मोक्‍काअंतर्गत अटकेत असणार्‍या प्रतापसिंहनगरातील दत्ता जाधव व त्याच्या साथीदारांना शनिवारी सातारा शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.प्रतापपूर (ता. जत, जि. सांगली) येथे पोलिस दलावर हल्ला केल्याप्रकरणी तसेच एका जमिनीच्या ताब्यावरून दाखल असणार्‍या गुन्ह्यात दत्ता जाधव व त्याच्या साथीदारांवर मोक्‍काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून त्याला येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहेे. त्याच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात खंडणी, अपहरण तसेच भुईंज पोलिस ठाण्यात भंगार व्यावसायिकास धमकावत खंडणी मागितल्याचे गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याचा ताबा घेतला.

कडेकोट बंदोबस्तात दत्ता जाधवसह त्याच्या दोन साथीदारांना शनिवारी सायंकाळी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली.

No comments

Powered by Blogger.