राहुल कुंभार यांच्या सहकार्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत

चालक पोपट कदम याचां सत्कार करताना कुमार नरखेडे, शेजारी राहुल कुंभार, दत्ताञय महानवर, हनुमंत फडतरे, नंदकुमार सोनवलकर, दीलिप भोसले.


फलटण: सावलेश्‍वर टोल नाक्यावर पास नसल्याने त्या ठिकाणी प्रवाशांचा वेळ जात होता परिणामी कार्यालयात जाण्यासाठी उशीर होऊ लागला यासाठी पंढरपूर सोलापूर प्रवाशी ग्रुप कडून फलटण आगाराशी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु नव्यानेच रुजू झालेल्या आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे प्रवाशांचा वेळ वाचला. यामुळे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार केला.

फलटण आगाराची गेली 21 वर्षांपासून फलटण-अक्कलकोट ही बस सेवा सुरू आहे. ही बस सोलापूर येथे सकाळी 10 वाजता व जलद पोहचत असल्याने जवळजवळ नातेपुते येथून मोठया प्रमाणावर नोकर वर्ग या बसने प्रवास करीत आहे तसेच या मार्गावर अक्कलकोट मंदिरात जाणारी पहिली बस असल्याने फलटण पासून या बसला भाविक ही मोठ्या प्रमाणात असतात या बरोबरच या बसचे चालक व वाहक यांचेकडून प्रवाशांना अतिशय विनम्र सेवा दिली जाते यामुळे या बसला अतिशय चांगला प्रतिसाद आहे परंतु या बसला सावलेश्‍वर टोल नाक्यावर पास नसल्याने त्या ठिकाणी प्रवाशांचा वेळ जात होता परिणामी कार्यालयात जाण्यासाठी उशीर होऊ लागला यासाठी पंढरपूर सोलापूर प्रवाशी ग्रुप कडून फलटण आगाराशी गेल्या वर्षभरापासून पास काढण्यासाठी सतत पाठपुरावा केला. राहुल कुंभार आगार व्यवस्थापक म्हणून रुजू झाले त्यांचेकडेही पास बाबत पाठपुरावा केला. त्यांनी याची तात्काळ दखल घेऊन या बसचा पास काढून देण्यात आला यामुळे प्रवाशांचा दररोजचा वेळ वाचला व महामंडळाच्या खर्चात बचत केली याचे अवचित्त साधून 26 जानेवारी 2019 रोजी फलटण येथे जाऊन पास काढून प्रवाशाच्या वेळेत व खर्चात बचत केली म्हणून आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांचा प्रवाशीग्रुपचे अध्यक्ष कुमार नरखडे, प्रकाश घोडके उपाध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रवाशांना ज्याच्यामुळे 21 वर्षे विनम्र सेवा घडली अशा चालक पोपट कदम, भिवरकर चालक व सौ अश्‍विनी गोसावी, रुपाली पालवे, अशोक लवटे, गणेश सोनवलकर या वाहकांचा संघटनेच्या व ग्राहक पंचायत यांच्या वतीने गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी स्थानक प्रमुख हणमंत फडतरे, वाहतूक निरीक्षक दत्तात्रय महानवर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक नंदकुमार सोनवलकर वाहतूक नियंत्रक अमोल वडगावे, पंकज वाघमारे, दत्ताञय मुळीक, विवेक शिंदे तसेच सातारा जिल्हा ग्राहक पंचायत विभागीय संघटक दिलीप भोसले तालुका उपाध्यक्ष संजय जाधव सहसंघटक शिवाजीराव नाईक निबाळकर, शाहूराजे भोसले उपस्थित होते. दत्ताञय महानवर यांनी सुञसंचलन केले.
फलटण आगारातील वाहक श्रीपाल जैन यांनी आभार मानले.

No comments

Powered by Blogger.