जन लोकपालच्या मागणीसाठी निवेदन

नायब तहसिलदार नंदकुमार भोईटे यांना निवेदन सादर करताना भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे कार्यकर्ते. 


फलटण: ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीच्या समर्थनार्थ येथील अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्यावतीने विविध प्रकारे आंदोलने करण्यात येणार असल्याचे निवेदन नायब तहसिलदार नंदकुमार भोईटे यांना देण्यात आले.

यावेळी फलटण तालुका संघटक पोपटराव बर्गे, फलटण पदाधिकारी विक्रमसिंह निंबाळकर, हनुमंत मोरे, सतिश दळवी, जावेद शेख, सचिन भगत, अशोक शेटे, चंद्रकांत सूर्यवंशी, कविता खरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आण्णा हजारे हे आमरण उपोषण सत्याग्रह आंदोलन महात्मा गांधी बलिदान दिन (दि.30 जानेवारी) पासून राळेगणसिद्धी येथे सुरु करत आहेत. या सत्याग्रह आंदोलनात आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे फलटण तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी होत आहेत. त्यादृष्टीने आपल्या भागात जनआंदोलन उभारण्यात येणार असून यामध्ये उपोषणे, सत्याग्रह रणे, घंटानाद, चौकसभा, कॅन्डल मोर्चा, प्रभात फेरी, जनतेच्या प्रत्यक्ष भेटी, निवेदन देणे, लोकजागृती करुन मोठ्या प्रमाणा प्रमाणावर नागरिकांना यामध्ये सहभागी करुन घेणे आदी प्रकारे जनलोकपाल विधेयकाचा लढा अहिंसक पद्धतीने करण्यात येणार आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदरचे निवेदन रजिस्टर कार्यालय उपअधिक्षक अहिवळे, भूमापन कार्यालय उपअधिक्षक पाटील, पुरवठा अधिकारी कदम आदींना देण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.