Your Own Digital Platform

दख्खन व मानिनी जत्राचे 11 ते 17 फेब्रुवारी कालावधीत सातारा येथे आयोजन

सातारा : पुणे विभागीय व जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन दख्खन व मानिनी जत्राचे आयोजन 11 ते 17 फेब्रुवारी 2019 या कालावधीत येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे आदी उपस्थित होते.

दख्खन व मानिनी जत्रेसाठी 200 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. या दख्खन व मानिनी जत्रेचे उद्घाटन 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद मैदान येथे करण्यात येणार आहे. यावेळी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे, अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांना पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दख्खन व मानिनी जत्रेमध्ये 44 फुड स्टॉल व 156 इतर व्यवसायाचे स्टॉल ठेवण्यात आले आहे. यामध्ये स्वयंसहायता गटाकडून उत्पादीत केलेल्या मातीची भांडी, स्ट्रॉबेरी जेली, टेडी वेयर, हातसडीचे तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, जुट बॅग, पापड-लोणची, गारमेंट, शोभेच्या वस्तु, खाद्यपदार्थ, विविध प्रकारच्या चटण्या, सेंदीय गुळ, काकवी, लाकडी खेळणी यासह विविध प्रकारचे स्टॉल असणार आहेत. तसेच या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. याचा जिल्हावासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले आहे.