Your Own Digital Platform

गोखळी ग्रामपंचायतीचे 12 जागांसाठी 25 उमेदवारी अर्ज.
राष्ट्रवादी कॉग्रेस अंतर्गत दुरंगी लढत

गोखळी: फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी ग्रामपंचायतीच्या 12 जागांसाठी निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या अखेरीच्या दिवशी 25 उमेदवारी अर्ज राहील्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस अंतर्गत दोन गटात दुरंगी निवडणूक होणार हे स्पष्ट झाले.

पंचवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक बिनविरोध करण्याचे दोन गटाकडुन प्रयत्न निष्फळ ठरले.ग्रामपंचायतीसाठी रविवार दि 24 फेब्रुवारी 19 रोजी सकाळी 7-30 ते सायंकाळी 5-30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर मतमोजणी सोमवारी दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता फलटण तहसिलदार कार्यालयात होणार आहे. माजी सरपंच मनोज तात्या गावडे विरोध विश्वास दादा गावडे यांचे नेतृत्वाखाली पॅनल मध्ये लढत होत आहे. सरपंच पदासाठी प्रथमच थेट निवडणूक होत आहे सरपंच पद महिला ओबीसी प्रवर्गसाठी आरक्षित आहे.

सरपंच पदासाठी मनोज तात्या गावडे यांच्या आई सौ.सुमन हरीभाऊ गावडे विरोधात जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.उषादेवी गावडे यांच्या सुनबाई सौ.निलम मयूर गावडे तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 11 जागांसाठी 23 उमेदवार पुढील प्रमाणे मनोज तात्या गावडे( सवई ) पॅनेलचे उमेदवार वार्ड 1-सौ.अलका दीपक जगतात, सौ.तेजश्री सुनील धुमाळ, वार्ड 2 रंजना राधेश्याम जाधव, हणमंत ज्ञानदेव आटोळे ,सागर आत्माराम गावडे वार्ड 3- अभिजित सुरेश जगतात, अमित सुनील गावडे ,सौ.उमाबाईं शैलेश जगतात वार्ड 4- सौ.वंदना शांताराम गावडे, निलेश नंदकुमार घाडगे, सौ.सपना योगेश गावडे तर विरोध विश्वास दादा गावडे पॅनलचे सरपंच पदासाठी सौ.निलम मयूर गावडे तर सदस्य पदासाठी वार्ड 1- सौ.हेमलता अनिल जगतात सौ सुनीता अनिरुद्ध गावडे वार्ड 2- नारायण कृष्णा आटोळे, संदीप भगतसिंह गावडे, सौ.सुवर्णा बाळासाहेब धनवडे वार्ड 3- रमेश भाऊसो जगतात, राजेन्द्र सोपाना गावडे, कु.पुनम गंगाराम जगतात वार्ड 4- फडतरे शितल अमर,सौ.लता गंगाराम गावडे, सुनिल तुकाराम घाडगे, तर अपक्ष म्हणून शशीकांत उर्फ बंडू आबासो फडतरे असे उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. गोखळी ग्रामपंचायत फलटण पूर्व भागात राजकीय दृष्ट्या महत्त्व पूर्ण ग्रामपंचायत समजली जाते. यामुळे गोखळी ग्रामपंचायतीचे निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.