Your Own Digital Platform

सॅमसंगचा ’गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टिव्ह 2’ लॉन्च

मुंबई : सॅमसंगने सुरुवारी नवीन टॅबलेट ’गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टिव्ह 2’ लॉन्च केला आहे. या टॅबला मिलिट्री ग्रेड डिझाईन देण्यात आली आहे. भारतात या टॅबची किंमत 50 हजार 990 रुपये आहे.

या टॅबमध्ये हाय टचशिवाय पोगो पिन देण्यात आली आहे. पोगो पिन एक डिवाईस आहे. डिवाईसच्या मदतीने अनेक डिवाईस एक साथ जोडले जातात आणि चार्ज केले जातात. तसेच सहजपणे डिवाईस कोणत्याही लॅपटॉपला किंवा किबोर्डला कनेक्ट करणं शक्य आहे.

याशिवाय ’गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टिव्ह 2’मध्ये 4450 चहि ची रिप्लेसेबल बॅटरी, एस-पेन, बायोमॅट्रिक ऑन्थेटिकेशन आणि सॅमसंग सिक्युरिटी प्लॅटफॉर्म नॉक्स देण्यात आला आहे. यामुळे टॅबमधील संवेदनशील माहिती हॅकर्सपासून सुरक्षित ठेवता येणार आहे.

सॅमसंग ’गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टिव्ह 2’ला एमआयएल-एसटीडी-810 जी आणि आईपी 68 सर्टिफिकेट मिळालं आहे. हा टॅब वायब्रेशन, जमिनीवर पडणे, पाऊस, धुळ, उष्ण तापमान यापासून पूर्णपणे सुरक्षित राहील असा दावा करण्यात येत आहे. तसेच अर्धा तास दीड मीटर पाण्यात राहिला तरी या टॅबला काही होणार नसल्याचा दावा केला जात आहे. मार्च महिन्यात हा टॅब उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.