भारत वि. न्यूझीलंड टी-20 मालिका आजपासून

वेलिंग्टन (वृत्तसंस्था): वर्ल्डकप काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडमध्ये वनडे मालिका जिंकली. पाचव्या वनडेमध्ये भारताला विजयासाठी मेहनतही करावी लागली होती. मात्र अखेर बाजी मारली ती भारतानेच. एकूणच वर्ल्डकपच्या दृष्टिने तयारी छान झाली आहे. आज, बुधवारपासून रंगणार्‍या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतूनही भारतीय संघाला काही गोष्टींचा अंदाज घ्यायचा आहे. आज वेलिंग्टनमध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यातील तीन लढतींच्या टी-20 मालिकेतील पहिली झुंज रंगणार आहे.

...
म्हणून यश आवश्यक
या टी-20 मालिकेतीय यश भारतीय संघाचा आत्मविश्‍वास आणखी बुलंद करेलच; पण न्यूझीलंडमध्ये भारताला अद्याप एकही टी-20 झुंज जिंकता आलेली नाही. तेव्हा टी-20 विजयाचा श्रीगणेशाही याच मालिकेतून करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. 2009मध्ये न्यूझीलंडमधील टी-20 मालिका भारताने 0-2 अशी गमावली होती. या टी-20 मालिकेतील यश आणखी एका कारणाने भारतासाठी महत्त्वाचे ठरेल अन् ते म्हणजे जिंकण्याची जी सवय भारतीय संघाला लागली आहे ती कायम राहील.

औस्तुक्य संघाचे...

गेल्या दोन वर्षांत भारत आणि इंग्लंड हे संघ वगळता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बहुतेक संघांनी आपल्या अंतिम अकरामध्ये खास करून सलामीच्या जोडीमध्ये बर्‍यापैकी बदल केले आहेत. भारताने आपल्या सलामीवीरांच्या जोडीत बदल केलेला नाही. त्यात विराट कोहलीची कामगिरीही सर्वश्रूतच आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजीच्या पहिल्या तीन क्रमांकांमध्ये फारसे बदल झालेले नाही. आता विराट कोहली सुटीवर असून लोकेश राहुल एका वेगळ्याच कारणाने संघाबाहेर आहे. तेव्हा टी-20 क्रिकेटमध्ये तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी कोण येणार याबाबत उत्सुकता आहे.

न्यूझीलंडवर नजर

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील कटू आठवणी बाजूला सारायच्या असतील तर न्यूझीलंडला ही टी-20 मालिका जिंकावी लागेल. गेल्या सात टी-20 मालिकांपैकी न्यूझीलंडला फक्त दोन मालिका जिंकता आल्या आहेत. अलीकडेच यूएईमध्ये पार पडलेल्या मालिकेत त्यांनी पाकिस्तानविरुद्ध सपाटून मार खाल्ला होता.

No comments

Powered by Blogger.